ॐ शक्ति है ॐ ही ईश्वर प्रतीक है
ॐ नश्वर है ॐ ही सर्वत्र एक है
ॐ भक्ति है ॐ ही शान्ति मंत्र है
ॐ जगत है ॐ ही जीवन तंत्र है
ॐ में तुम हो ॐ हर कण तुम में
ॐ मृदा धातु जल वायु गगन में
ॐ सत्य है ॐ ही चिंतन मनन है
ॐ आत्मा है ॐ ही प्रभु शरण है
ॐ विष्णु है ॐ ही त्रिकाल महादेव है
ॐ दृष्टि है ॐ ही सुर और रव है
ॐ विद्यमान है प्राण है हर जीव में
ॐ ही सजीव में ॐ ही निर्जीव में
ॐ संगीत है ॐ ही श्रेष्ठ मित्र है
ॐ असत्य पर विजय का शस्त्र है
ॐ ब्रह्माण्ड है ॐ उत्पत्ति सूत्र है
ॐ मोक्ष है ॐ ही मुक्ति स्रोत है
ॐ चहुँ ओर ज्ञान का प्रकाश है
ॐ कष्टकाल अंधकार का विनाश है
शायिर: विनय प्रजापति ‘नज़र’
लेखन वर्ष: १९९८
मला आवडलेले दुवे इथे देता यावेत यासाठी दुवादान हे नवे वर्गिकरण बनवत आहे.
स्क्राईबफायर चा वापर करत या अनुदिनीला (ब्लॉग) पुन्र्जिवन देण्याचा प्रयत्न करत आहे.  स्क्राईबफायर हे एक फायरफॉक्स एक्स्टेन्शन आहे. ज्याचा वापर करून कुठलीही किरकोळ खरड तुम्हाल्या तुमच्या अनुदिनीवर डागता येत.
याचा वापर करत तुम्ही अक्षरांचा रंग, आकार, लेखनशैली, (अधोरेखन, काटछाट, ठळकपणा , वेगळेपणा , चित्रे,दुवे, इत्यादीसाठी सहजपणे करू शकता. सध्या इतकेच.
Powered by ScribeFire.
या आधी...
ही आईनस्टाईनसाठी मोठी झेप होती. आनंदानं त्यानं केवळ हवेत उडी मारायची बाकी ठेवली होती. त्याच्यासाठी ठीक होतं. पण आम्हाला तर त्याला कोंडून ठेवावसं वाटत होतं. त्याचं म्हणणं होतंच असं विचित्र!
आमच्यातलं कुणीसं म्हणालं, "आईन्या, वेड लागलंय तुला. अरे हेच बघ, तू ही ओढ तयार करायची म्हणतोस, ही अशी सूर्यासमोर ठेवायला. तुला ही ओढ म्हणजे काय पोरखेळ वाटते? अरे अशी कोणती ओढ आहे की जी मनात आलं की दिसेल नि मनात आलं कि रुसेल? तेही तू 'स्थिर' कशाला म्हणतोस यावरून. ओढ अशी थोडीच असते, त्याला नाईलाज आहे."  आईनस्टाईन म्हणाला, "हां! हेच तर मी म्हणतोय. ही ओढ आहेच अशी अवखळ, नाटकी." आम्ही म्हटलं, "बास झालं आईन्या. हरलास तू. तुझी 'ती' ओढ नाटकीच होती तर." एक कागदाची थप्पी पुढं सारत तो म्हणाला," हे घ्या. वाचा हे नि बसा बरळंत."
आम्ही वाचू लागलो. म्हणजे तसा प्रयत्न केला. साधारणसा. हे काहीतरी अजब गौडबंगालच होतं.  काहिंना समजलंही म्हणे, बाकीचे ओळी मोजत होते. "हम्म!!".  काहीजण म्हणाले, "आणि जरी हे खरं असलं, तरी आपली जुनी थापच बरी आहे." अहो या पठ्ठयानं जे काही लिहीलं त्याचा घड मागंच लागत नव्हता!
पण हरमन- नाव आहे, म्हणाला त्याला काहीतरी खास समजलं म्हणे. त्यानं नि आईनस्टाईननं मिळून एक नवीनच कथा रचली. ती काहिशी अशी...
तुम्हाला आपण कसं हालू शकतो हे माहितंच आहे. वर-खाली, डावी-उजवीकडे आणि पुढे मागे. हरमन म्हणाला, "यात आपण आणखी एकाची भर घालु - काळ. बरोबर, ही सुद्धा हालण्यासाठीची एक दिशा." "चार काय... ठीक." सारे म्हणालो.  आता दोघे थोडे गंभीर झाले. म्हणाले, "आता हे चारही पर्याय वापरत आपण काय काय करू शकतो ते पाहू. समजा हे चार प्रकार वाकवता आले तर? अंहं! असं नव्हे की यात जी गोष्ट आहे ती वाकवायची. पण हे चार पर्यायच वाकवले तर?" काही म्हणाले, "आता आणखी वाकड्यात शिरू नका बाबांनो." पण ते दोघे थांबणारे नव्हते, म्हणाले "हे घ्या!"
समजा वस्तूमानामुळं हे पर्याय वाकत असले तर? जिथं जितकं वस्तूमान जास्त तिथं तितकाच मोठा खळगा. समजा दोन जागा आहेत. 'क' आणी 'ख'. आपापल्या काळातल्या. एक एका वस्तूमानाच्या या बाजूला आणि दुसरी त्या बाजूला. आता एखादी गोष्ट 'क' कडून 'ख' कडं गेली, तर कशी दिसेल? तुम्ही म्हणाल सरळ रेषे सारखी. खरं तर हो ही आणि नाही ही. रेष आहे खरी. पण वाकलेली. जेंव्हा ती त्या खळग्यातून प्रवास करते ना, त्या भागापुरती.  ही रेष एका रेषे सारखी तेंव्हाच दिसेल जेंव्हा आपण चारही मिती लक्षात घेऊ. तुम्ही 'क' कडून 'ख' कडं बघत असाल तर फक्त टिंबच दिसेल. जर काळ लक्षात घेता येत नसेल तर ही रेष मध्येच काहीशी भरकटलेली दिसेल.  असं करू. फार मोठं काही तरी घेऊ. सूर्य. सूर्य घ्या.  आता 'क' आणी 'ख' सूर्याच्या जवळ असूद्यात. एकाच जागी पण वेगवेगळ्या काळा मध्ये. थोडावेळ जाऊ द्या. 'क' कडून 'ख' कडं जाणारी रेष आता तुमच्या-माझ्यासाठी एक वक्राकार कमान असेल.  (लक्षात घ्या आपण पर्उठ्वीसोबत प्रदक्षिणेवर आहोत.) एक अशी कमान की जी फिरतच राहिल नि जिच्या केंद्र भागी असेल आपला सूर्य.
"पाहिलंत!" अल्बर्ट म्हणाला. "तुम्ही म्हणाता सूर्याला ओढ आहे. पण आपण जेंव्हा सूर्या भोवती फिरतो, त्यालाच अक्ष बनवून,  हे  असे या चार मितीं मध्ये, तेंव्हा आपण खरं तर एका सरळ रेषेतच जात असतो. आपण प्रदक्षिणा घालतच नाही आहोत मुळी. म्हणूनच म्हणतो कि ही ओढ फसवी आहे, नाटकी आहे. तुम्हाला सरळ रेषेत रहायला दुसर्या कुढल्याच ओढीची गरज नाही!" आमच्या पैकी आणखी काही जणांना काहीतरी समजलं. ते म्हणाले, " तुम्ही दोघं हा नाद सोडून का नाही देत? हे खरं असूही शकेल, पण भलतंच तिरपागडं आहे." "मग घ्या खात्री करून!"'
आता आम्ही या सार्याचा खरे खोटेपणा प्रत्यक्षपणे बघायचं ठरवलं...
त्याच्या म्हणण्यानुसार, सूर्याचे किरण न्यूटनच्या म्हणण्यापेक्षा थोडे जास्तच लालसर होते. ते खरंच होतं. त्याच्या म्हणण्यानुसार मंगळ न्यूटनच्या तुलनेत थोडासा दूर होता. तो ही होता. विशेष म्हणजे, जे आता वरच्यावर सांगितलं जातं, तेच ते, दिवसा तारे दाखवणारं उदाहरण! तुम्हाला माहितच आहे, जेंव्हा चंद्र सूर्य आणि पर्उथ्वी यांच्या मध्ये येतो, सूर्यग्रहण. याच वेळी तुम्हाला सूर्याच्या अगदी जवळचे तारे नक्की कसे आहेत हे पाहायची संधी मिळते. (अर्थातच आकाशात त्याच्या जवळ दिसणारे. आलंच असेल लक्षात. ) आम्ही त्यांच्याकडं बारकाईनं पाहिलं. पुस्तकाच्या आधारानं ते तारे कुठले आहेत, हे ही पाहिलं.  या तार्यांपासून आपल्याकडं येणारी सूर्यकिरणं सूर्यापासून येताना वाकतात. अल्बर्टनं सांगितलं की ते किती वाकतील. न्यूटननं ही ते वाकतील असं सांगितलं होतंच पण त्याच्या तुलनेत अल्बर्ट ची वक्रता जास्त होती. साधारण दुप्पट. तर मग आम्ही तार्यांकडं बघत होतो नि हातातल्या पुस्तकात. याचा प्रयोगाचा निष्कर्ष तुम्हीही मला सांगू शकाल.
आम्ही आंवढा गिळत, मटकन खाली बसलो. थोड्या वेळानं अल्बर्टला म्हणालो, "खरंच डोकेबाज आहेस बाबा. हे सारं तुला सुचलं कसं?" "आता तू ही हातातली नोकरी सोड नि चल आमच्या बरोबर"
आम्हाला आता अल्बर्ट आवडायला लागला होता.
~ समाप्त ~
थोडक्यात, हे सारं असं होतं. बापरे, वेळ तर पाहा किती झालीय ती! मी बराच वेळ काढला ना? चला. आता आटपतो. तुम्ही लक्ष देऊन वाचता हे पाहून बरं वाटलं. या उपद्व्यापाचा काहीतरी उपयोग झाला असेल अशी आशा आहे.
तळटीप
मूळ लेखन : ब्रायन रेटर (मपेट लॅबस्)
मूळ लेख : छोट्या छोट्या शब्दात सापेक्षता.
वैशिष्ट्य: मूळ लेखामालेचे वैशिष्ट्य म्हणजे सारी लेखमाला चार किंवा त्याहूनही कमी अक्षरांच्या शब्दात लिहिली आहे.
टिप्पणी : मूळ लेखमाला अप्रतिम आहे. भाषांतर भाषांतर वाटल्यास, विषयांतर वाटल्यास, गोंधळात टाकणारे वाटल्यास वा अर्थ बिघडवणारे वाटल्यास त्याचा दोष आहे. लेखाच्या सुरसतेचे, सुलभतेचे सारे श्रेय मूळ लेखकाचे आहे. या विषयावर अधिकार वाणीने बोलण्याची त्याची प्राज्ञा नाही, मूळ लेख वाचून अर्थाचा अनर्थ होत असल्याचे लक्षात आल्यास त्याच्या नजरेस आणून द्यावे ही विनंती. त्याला रुचलेला लेख चोखंदळ वाचकांपुढे पोहोचवण्याचा हा प्रयास मात्र होता.
Powered by ScribeFire.
न्यूटन म्हणायचा,  "एक ताटली घ्या. त्यात थोडसं दुध घ्या. आता ताटली बोटावर धरून फिरवा. काय होतं? दूध कडेला सरकत सरकत बाहेर सांडतं." "त्यात काय विशेष?" हेच ना? अहो फिरण्यामुळं ओढ निर्माण होते, दूध बाहेर सांडतं. असंच ना? पण जर मी दूध 'स्थिर' होतं असं म्हणायचं ठरवलं तर?
याचाच अर्थ आकाश बिकाश हे सारं फिरत आहे आणी ही ताटली नि दूध 'स्थिर'. असंच ना? मग सांगू शकाल हे असं दूध बाहेर का सांडतं? अशा 'स्थिर' दुधाला बाहेर उडी मारायला भाग पाडलं तरी कुणी?
याच वेळी न्यूटन पुढं आला. म्हणाला, " होय. निरपेक्ष स्थिरता नसतेच. तुम्ही जेंव्हा जागा बदलता, तेंव्हा कुणी म्हणेल तुम्ही बदलता, कुणी म्हणेल नाही. ते ठीक ही आहे. पण या ओढीचं तर तसं नाही ना! ओढ आहे ही आहेच."
पण आईनस्टाइनचं मन घट्ट. त्याला पक्कं माहित होतं कि यात यापेक्षाही अधिक काहितरी दडलेलं आहे.  मी मग न्यूटनला म्हणालो, "आपण या जुन्या ओढी बरोबरच आणखी एक ओढ आणू!" (खरं तर सुरुवातीला त्यालाही ही कल्पना थोडी विचित्रच वाटली.) सरळ शब्दात सांगायचं तर.. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही नवी ओढ बरीचशी जुन्या ओढीसारखीच होती.
आता असं करू, मी तुम्हाला एका खोक्यात बसवलं. आणि ते खोकं एका पोकळीत ठेवून दिलं. (इथं मला निरपेक्ष पोकळी अपेक्षित नाही बरं. थोडं बाकीच्या ओढीं पासून दूर राहिलं तरी पुरे आहे. हवं तर एखाद दोन तारे/तारका वगैरे घ्या सोबतीला. फारसे जवळ घेऊ नका म्हणजे झालं. ठीक?) आता समजा मी त्या खोक्याला एक दोर बांधला. त्याचं दुसरं टोक बांधलं एका गलबताला. मी त्या गलबतात बसलो नि सुसाट वेगाने पुढे सरकलो. वेग आणखी वाढवला. आणखी. आता जोवर मी तुम्ही सारख्याच दरानं वेग वाढवत आहात याची खबरदारी घेईन, तोवर तुम्हाला या इथे जशी ओढ जाणवते तशीच ओढ जाणवेल. जर तुमच्या कडं एक शिशाचा आणी एक लाकडाचा चेंडू असेल नि तुम्ही दोन्ही एकाच वेळी सोडले, तर ते एकाच वेळी खाली पडतील. थोडं विचित्र वाटतं ना? गोंधळलात? आम्ही ही गोंधळलो होतो.
हे नक्की असं का होतं हे सांगायला कुणीच धजावत नव्हतं. निदान तोवर तरी. तो अल्बर्ट, त्यानं तो चेंडू उचलला नि सुटला पळंत. अगदी दिसेनासा झाला. सुरवातिला वर्षभर. नंतर मग आणखी दहा वर्षं. अहो खरंच! इतका वेळ! आणि खरं सांगायचं तर हे बागेत फेरफटका मारण्यासारखं मुळीच नव्हतं. आमच्या पैकी काही जण तर म्हणाले कि तो परतणारच नाही. पण जेंव्हा तो परत आला, नि म्हणाला, "ही जी नवी ओढ आपल्याला न्यूटननं दाखवली, ती खरं तर जुनीच आहे. 'तशीच' नव्हे, तीच आहे. या दोन्ही अगदी सारख्या आहेत.  मग तुमच्या लक्षात येईल की एक खरी अशी 'ओढ' असंतच नाही."
आलं का लक्षात तो काय म्हणाला ते? जेंव्हा तुम्ही त्या खोक्यात बंद होता, तुम्हाला नुसती 'घरच्या सारखी' ओढ भासत नव्हती, तर ही ओढ त्याच प्रकारची होती. आता जर तुम्ही म्हणालात, "आता जर त्या खोक्यालाच 'स्थिर' मानायचं ठरवलं तर? आता काय? आता ते चेंडू कशानं खाली पडले?" तर आइन्स्टाईन तुम्हाला म्हणेल, "ही जी पोकळी होती ना आजुबाजूला, तीच  एका ठराविक दरानं वेग वाढवत होती, ज्याची ओढ तुम्हाला नि तुमच्या खोक्याला जाणवली." तुम्ही म्हणाल, "ए, बस झालं हं आता. त्या पोकळीतलं वस्तुमान माझ्यावर अशी एखादी ओढ आणायला फाऽऽर दूर आहे." पुन्हा आइनस्टाईन म्हणेल, "नाहीच. तुम्हाला कळलंच नाही तर! त्या पोकळित किती वस्तुमान आहे, याचा प्रश्न नाहीच मुळी! त्याचा पोकळीत वस्तुमान आहे, यातंच सारं आलं. तुम्ही नि तुमचं खोकं सोडून सारं काही."
तीच गोष्ट त्या दुधाची. तुम्ही म्हणालात, "ताटली स्थिर आहे", तर तो म्हणेल, "बाकि सारं (विश्व) फिरत आहे कि ज्यामुळं दुधाला ही ओढ आहे, ज्यानं ते बाहेर सांडतं."
थोडक्यात काय, न्यूटन म्हणाल कि तुम्ही एखाद्या वेळी स्थिर आहात की नाही हे नक्की सांगता येणं शक्य नाही. तुम्ही म्हणता मी हालतोय, बाकी सारं स्थिर आहे काय, किंवा याच्या उलट काय. एकूण अर्थ एकच. पण आईनस्टाईन म्हणाला इतकंच नव्हे, तर तुम्हाला एखादी ओढ आहे, कि नाही हेही सांगता येणं अशक्य आहे. सरते शेवटी, तुम्ही कुढल्याही वेळी, कुठल्याही प्रकारे, 'स्थिर' असू शकत नाही. तुम्ही वर-खाली, इकडं तिकडं कशाही उड्या मारा हवं तर, पण तरिही तुम्ही स्वत:ला स्थिर म्हणवू शकताच.
ही आइनसाठनची मोठी झेप होती. आनंदानं त्यानं केवळ हवेत उडी मारायची बाकी होती. त्याच्यासाठी ठीक होतं. पण आम्हाला तर त्याला कोडून ठेवावसं वाटत होतं. त्याचं म्हणणं होतंच असं विचित्र!
(क्रमश:)
Powered by ScribeFire.
ज्यांना हिंददी वाचनाची आवड आहे त्यांच्यासाथी अभिव्यक्ति हे संकेतस्थळ म्हणजे पर्वणीच आहे. इतेह आपल्याला अनेक मान्यवर लेखांचे लेख, त्यांच्या बद्दलची माहिती अत्यंत सुटसुटीत रित्या उपलब्द आहे.
चित्रपटातील हिंदी (?) विटलेल्यांना शुद्ध हिंदी काय असते हे आठवण्यासाठी या संकेतस्थळाचा उपयोग व्हावा.
Powered by ScribeFire.
जे रुचे ते उचलण्याची सवय झाली,
या इथे ते छापण्याचीयाची सवय झाली!
लेख कविता चर्चा वा ही विडंबने,
रोज 'पाट्या टाकण्याची सवय झाली
पाहा! तोल ही ढळे चर्चा रंगताना,
काय झाले? भांडण्याची सवय झाली
ढीग नसत्या प्रतिसादांचा पाडताना,
मूळ चर्चा चुकवण्याची सवय झाली
वेळ कुठली  मते सारी वाचण्याला,
जे माझे ते दामटण्याची सवय झाली
जोडल्याविण जात नाही दिवस त्याचा,
मोकाट जी वावरण्याची सवय झाली
Powered by ScribeFire.
आपल्याला विकीपीडिया  या माहितीच्या व ज्ञानाच्या महासागराची कल्पना नाही ही गोष्ट मला पटतंच नाही तरीही माहिती द्यायला काय हरकत आहे :)
'विकिपीडिया' हा एक मुक्त ज्ञानकोश प्रकल्प आहे. ही त्याची आवृत्ती आपण घडवू शकता. 'विकिपीडिया' मध्ये लेखांची भर घालण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. नवीन लेख लिहिण्यास उपयुक्त माहिती येथे आहे. सध्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये लेखांची एकूण संख्या १२,८८९ आहे. मराठी भाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास विकिपीडिया लवकरच प्रगती करेल. भेट दिल्याबद्दल धन्यवाद!
चला! आता पर्यंतच्या लेखात 'आपण नक्की किती वेगाने जात आहोत' हे कसं
पाहायचं (किंबहुना कसं पाहायचं नाही!) हे पाहिलं. आता तुम्हाला आपण प्रवास
करतो, जातो, हालत आहोत म्हणजे काय याचा थोडासा खुलासा मला करायचा आहे. मी
जेंव्हा 'प्रवास करणं' म्हणतो याचा अर्थ वेगात बदल न करता. वेग न वाढवता,
न कमी करता. आणि हो! दिशेतही बदल न करता. तुम्ही प्रवास करता म्हणजे
तुम्ही त्याच दिशेत, त्याच वेगाने जात राहता. याचा अर्थ तुम्ही कुठल्याही
'ओढी' (पुल) खाली हा प्रवास करत नाही. तुम्ही म्हणाल, "याचा इतका बाऊ
करण्याची गरज काय?" मी हेच तर सांगणार आहे आज.
जरा ऍरिस्टॉटलनं काय सांगितलं ते आठवून पाहा. तोच म्हणाला होता की "जर
तुम्ही स्थिर असाल तर स्थिर राहता, व जरी हालला तरी पुन्हा त्याच स्थिर
स्थितीत परत येता." तो चुकत होता, हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. कारण
'हवेचा प्रतिरोध तुम्हाला स्थिर करण्यास कारणीभूत आहे' हे त्यानं
हे सांगताना लक्षात घेतलं नव्हतं. असंच ना?
पण याची उकल व्हायला आपल्याला न्यूटननं यात लक्ष घालेपर्यंत वाट पाहावी
लागली. तो म्हणाला, "नाही ऍरिस्टॉटल, चुकलासच तू! जर तुम्ही प्रवास करत
असाल, तर करतच राहता. उलट तुम्हाला पुन्हा स्थिर करायलाच बाहेरून ताकद
लावायची गरज पडते." अर्थात रोजच्या आयुष्यात, हे काम हवेचा प्रतिरोध करेल,
आणि तुम्ही स्थिर व्हाल.
हो! आणखी एक. अशीच एक ओढ आपल्याला 'खाली म्हणजे काय?' 'वर म्हणजे काय?'
याची जाणीव करून देते. तीच आपल्याला धरून ठेवून आहे. न्यूटनला हे लक्षात
आलं की ही तीच ओढ आहे जी चंद्राला पृथ्वी भोवती फेर्या मारायला लावते.
अशा ओढीमुळं आपली दिशा बदलते. (म्हणूनच मी वर तुम्हाला दिशा ही बदलायची
नाही असं म्हणालो ना!) चंद्रालाही या ओढीमुळेच आपली दिशा सतत बदलावी
लागते. ही जर ओढ नसती, तर तो तसाच निसटून दूर निघून गेला असता नि आपण
इथूनच हात हालवून त्याला निरोप दिला असता. सूर्याबाबतही आपली तीच गत झाली
असती. दररोज, नव्हे प्रत्येक क्षणी पृथ्वी अशी दिशा बदलते म्हणून ठीक.
नाहीतर आपण केंव्हाचे गारठून गेलो असतो. 'हे असं का होतं?' याचा उलगडा
न्यूटनला करायचा होता.
जर एखाद्या वस्तूचे वस्तुमान जास्त असेल, तर त्या वस्तूची ओढ असेल ना?
म्हणूनच आपण सूर्याभोवती फिरतो, सूर्य आपल्या भोवती नाही. खरं ना? पण हे
सगळीकडेच लागू व्हायला हवे ना? तुम्ही एक शिशाचा व एक लाकडी गोळा घेऊन
पाहा. दोन्ही एकाच वेळी एकाच उंचीवरून सोडून पाहा. शिशाची ओढ जास्त असायला
हवी ना? पण ते दोन्ही सारखाच वेळ घेतील. न्यूटन म्हणाला, "असं बघा, एकाच
वस्तूवर एकापेक्षा अधिक प्रकारच्या ओढी कार्यरत असतात. जितके त्या वस्तूचे
वजन जास्त, तितकीच त्या वस्तूची 'आहे तिथं राहण्याची' ओढ. या मुळेच तर
स्थिर असणारी वस्तू स्थिर राहण्याचा प्रयत्न करते. या सार्याचा परिणाम
म्हणूनच दोन्ही गोळे सारख्याच वेगानं खाली येतात."
मी याला 'एक नवी ओढ' म्हणणं पसंत करेन. पण यात नवे काय आहे? तुम्ही तर
सारखेच याचा अनुभव घेत आला आहात. जेंव्हा तुम्ही गाडीचा वेग वाढवता
तेंव्हा तुम्ही मागे खेचले जाता. थोडा वेळ जाऊ द्या, की ही ओढ गायब!. डावी
कडे वळा, नि हीच ओढ तुम्हाला उजव्या बाजूला ओढेल. थांबा, नि तुम्ही पुढे
खेचले जाल.
नाहीतर एखाद्या जत्रेत एका मोठ्या चक्रात बसून बघा. जसजसं तुम्ही फिरता
तसतसं तुम्ही बाहेर जाल की काय अशी भिती वाटू लागेल. इथे तुम्हीही फिरत
आहात. अगदी चंद्रासारखेच. जर तुम्ही तो पट्टा बांधला नसता, तर तुम्हीही
बाहेर फेकले गेला असता, सरळ रेषेत!.  (अर्थात एका पक्षाच्या
दृष्टिकोनातून! खरंतर, तुम्ही एका वक्राकारात खालीही याल, पण सध्या ते
बाजूला ठेवू.)
आता असं बघा, या ओढीकडे पाहता आईन्स्टाईनची जुनी कल्पना गडबडल्यासारखी
वाटते. पहिला भाग आठवा पाहू जिथं तुम्ही एका पोकळीत एकटेच होता.
'तुम्ही स्थिर आहात की नाही' हे तुम्हाला समजत नव्हते पण 'तुम्हाला ओढ
आहे की नाही' हे नक्कीच सांगता येत होते. हो ना? कारण तसं असतं तर ते
तुम्हाला जाणवलंच असतं नाही का? नक्कीच. तर तुम्हाला एक नि एकच अशी
निरपेक्ष स्थिरता नाही, वेळेकडे पाहण्याचाही एक नि एकच निरपेक्ष
दृष्टिकोन नाही (किंवा वस्तुमान वा आकार यांच्या कडे पाहण्यासाठीही
निरपेक्ष परिमाण नाही), पण तुम्हाला ओढ आहे की नाही हे नक्की कळण्याचा
मार्ग आहे असेच ना?. पण आईन्स्टाईन म्हणाला, "मला नाही पटत." आम्ही सारेच
म्हणालो, "का नाही रे? बस्स झालं हं आता."
पण आईन्स्टाईन इतक्यावरच ऐकणारा नव्हता आणि हे दिसतं तितकं सोपंही.
(क्रमशः)
हा अल्बर्ट अचानक कुठुनसा आला आणि म्हणाला, "किरण त्यांचा स्रोत स्थिर
वा अस्थिर असतानाच ठराविक वेगाने प्रवास करतात असं नाही तर तुम्ही स्थिर
असा किंवा अस्थिर, किरण ठराविक वेगानंच प्रवास करताना दिसतील." वरकरणी ही
फार मोठी गोष्ट वाटणार नाही, पण थांबा. याचा अर्थ असा की तुम्ही कितीही
वेगानं किंवा हळू जा, प्रकाश किरण तुमच्या दृष्टीने त्यांच्या नियमित
ठराविक वेगानंच जातील.
तुमच्या एका मित्राला पळू द्या आणि तुम्ही स्थिर राहा. तरीही तुम्हा
दोघांनाही प्रकाशकिरण एकाच वेगानं जाताना दिसतील! विचित्र वाटतंय ना?
तुम्ही परत जिथून सुरुवात केली तिथंच आला आहात. तुम्ही स्थिर आहात की नाही
हे तुम्हाला ठरवता आलं नाही. दिवा असो वा नसो. म्हणजे तुम्ही स्थिर आहात
का हे तुम्हाला माहीत नाही असं नाही, तर ते सत्य अस्तित्वातच नाही.
पण हे खरं असायला यात वेळेलाही आणणं भाग आहे. कारण तुम्ही व तुमच्या
मित्रानं, किरणांचा वेग मोजताना, तुलना करता यावी म्हणून वापरलेल्या
तुमच्या दोघांच्या कालाच्या संकल्पनाही वेगळ्या असून चालणार नाही. मला
माहीत आहे तुम्ही म्हणताय,"शक्यच नाही!, असे असूच शकत नाही." पण माझं ऐका,
हे असंच आहे. आईन्स्टाईननंच सांगितले तसं. तो म्हणाला...,
थांबा मी दाखवतोच तुम्हाला. नीट लक्ष द्या. एक 'तो' व एक 'ती' घ्या. एक
गाडी पण घ्या. त्याला त्या गाडीत बसवा. गाडीला रस्त्यावरून जाऊ द्या. ती,
तिला इथेच राहूद्या. रस्त्याकडेला एका बाकड्यावर. ठीक? 'तो' गाडीत आहे,
'ती' बाकड्यावर. आता एक उल्का घ्या. त्या उल्केला येऊ द्या या रस्त्याकडे.
समजा वातावरणातून येताना त्या उल्केचे दोन तुकडे झाले. एक रस्त्याच्या या
टोकाला पडला (बाजूला नव्हे हं, टोकाला) तर दुसरा त्या टोकाला. तिला दोन्ही
उल्का एकाच वेळी पडताना दिसतात.
पण त्याला एक उल्का आधी, तर एक उल्का नंतर पडताना दिसते. (तो, ज्या
दिशेला जातो त्यावर अवलंबून.) आता जर दोघांनीही ''ती' स्थिर आहे.' असे
मानायचे ठरवलं तर दोघेही म्हणतील की दोन्ही उल्का एकाच वेळी जमीनीवर
पडल्या. ती म्हणेल, "मी स्थिर आहे, नि मी दोन्ही उल्कांना एकाच वेळी
पडताना पाहिलं, आणि त्या खरोखरच एकाच वेळी पडल्या." आणि तो म्हणेल, "मी
एका उल्केपासून दूर जात होतो. हे लक्षात घेतलं की, मी ही जर स्थिर असतो तर
मलाही दोन्ही उल्का एकाच वेळी पडताना दिसल्या असत्या. आणि तसंच असावं.
म्हणजे त्या उल्का एकाच वेळी जमीनीवर पडल्या असाव्यात." ठीक.
पण आता त्या दोघांनी जर त्याला स्थिर मानायचे ठरवलं तर! अं? कोण स्थिर
आहे हे तुम्ही ठरवायचंय नाही का? चला मग त्याला स्थिर करूया. आता तो
म्हणेल," मी स्थिर आहे, तेंव्हा जी  उल्का मी जात आहे त्या दिशेला पडली ती
पहिली वा जी उल्का मला नंतर पडताना दिसली ती दुसरी." ती म्हणेल,"मला
दोन्ही उल्का एकाच वेळा पडताना दिसल्या, कारण मी त्या रस्त्याच्या पुढील
बाजूस पडलेल्या उल्केपासून दूर जात होते. हे लक्षात घेतलं तर ती उल्का
रस्त्याच्या दुसर्या बाजूस पडलेल्या उल्केच्या आधीच पडली असेल."
तर तुम्ही पाहिलं ही 'निरपेक्ष स्थिरता' नाही म्हटल्यावर 'निरपेक्ष
काळ' सुद्धा असू शकत नाही. आणि हे इतकंच नाही. तुमची अशी एका गोष्टीकडे
खर्या रितीनं पाहण्याची क्षमता गमावल्यावर तुम्ही त्याच्या आकाराचा वा
वस्तुमानाचाही खरा (निरपेक्ष) अंदाज बांधू शकत नाही. जोवर तुम्ही 'स्थिर'
म्हणजे काय हे ठरवत नाही तोवर या सार्याची व्याख्याच अशक्य आहे. आणि जर
तुम्ही हे ठरवले नाही, तर 'तो' किंवा 'ती' त्यांना हवी ती स्थिरता गृहीत
धरून, जसं आपण केलं,  वेगवेगळी वस्तुमाने व आकार खरे मानू शकतात. काय? घोळ
आहे ना?
आता तुम्हाला आईन्स्टाईन म्हणतो त्यातल्या काही बाबींचा उलगडा झाला
असणे शक्य आहे. पण हे, आपल्याला जे पाहायचं आहे, त्याच्या निम्म्या इतकंही
नाही. म्हणजे, जरी आईन्स्टाईनला वयाच्या दहाव्या वर्षीच एखाद्या गाडीने
धडक दिली असती, तरी आपल्याला हे सारं आपल्या गतीनं समजलंच असतं. पण या
पुढे त्यानं जे केलं तोच खरा मोठा धक्का होता.
(क्रमशः)